वेतनिका (Vetanika) हि महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंतर्गत संचालनालय लेखा व कोषागारे (Directorate of Accounts and Treasuries) द्वारा विकसित केलेली एक संगणकीय प्रणाली आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन पडताळणी प्रक्रियेला सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे आहे.
वेतनिका प्रणालीचे मुख्य कार्ये
§ सेवापुस्तक पडताळणी: कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी वेतनिका
प्रणालीद्वारे केली जाते. कर्मचारी, विभाग प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी (DDO) यांना सेवापुस्तकाची सद्यस्थिती पाहता येते.
§ सेवापुस्तक ID निर्माण व सबमिशन:
कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांसाठी ID निर्माण करणे आणि ते संबंधित वेतन पडताळणी पथकाकडे सबमिट करणे या सर्व
प्रक्रिया वेतनिका प्रणालीतूनच केली जातात.
§ आक्षेप व्यवस्थापन: जर सेवापुस्तकात कोणतेही आक्षेप असतील, तर ते वेतनिका प्रणालीतूनच नोंदवले जातात. आक्षेप लावल्यानंतर, संबंधित सेवापुस्तक पुन्हा सबमिट करण्यासाठी उपलब्ध होते.
§ पडताळणी प्रमाणपत्र: वेतन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, पडताळणी प्रमाणपत्र वेतनिका प्रणालीतूनच तयार होते आणि ते संबंधित
सेवापुस्तकात चिकटवले जाते.
विभागीय कार्यक्षेत्र
वेतन पडताळणी पथके महाराष्ट्र राज्यभर विविध विभागीय
मुख्यालयांमध्ये कार्यरत आहेत:
मुंबई: मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर कोकण: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
नाशिक: नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर नागपूर: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
औरंगाबाद: औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली अमरावती: बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ
Ø
वेतनिका प्रणाली प्रवेश
तुम्ही तुमच्या सेवापुस्तकाची स्थिती तपासू शकता, आक्षेपांची माहिती
मिळवू शकता आणि आवश्यकतेनुसार संबंधित कार्यवाही करू शकता.
अधिकृत माहिती, नियमावली आणि मार्गदर्शिका साठी, खालील लिंकवर भेट द्या:
Ø
वेतनिका मार्गदर्शिका
👉 यामध्ये
वेतनिका संकेतस्थळाचे लिंक तसेच युजर मॅन्युल व सेवापुस्तकाची वेतन पडताळणीची स्थिती
पाहता येईल.
|
अ.क्र. |
तपशील |
पहा |
|
1 |
वेतनिका संकेतस्थळ |
|
|
2 |
वेतनिका युजर
मॅन्युल |
|
|
3 |
Pay Verification Track Your Service Book Status |