VPDA

आभासी वैयक्तिक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Account (VPDA)

👉 Virtual Personal Deposit Account (VPDA) म्हणजे काय ?

Virtual Personal Deposit Account (VPDA) म्हणजे एक आभासी वैयक्तिक ठेव खाते, जे प्रत्यक्षात बँकेत नसते, पण BEAMS प्रणालीमध्ये डिजिटल स्वरूपात अस्तित्वात असते. याचा उपयोग विभागांना विशिष्ट योजना किंवा उपक्रमांसाठी मंजूर निधीचे पूर्व-नियोजन व नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो.

🎯 VPDA चे उद्दिष्ट:

Ø  निधीचे प्रभावी नियोजन आणि वापर सुनिश्चित करणे.

Ø  खर्चामध्ये पारदर्शकता आणणे.

Ø  बिनधास्त व बिनवापराचा निधी टाळणे.

Ø  विविध विभागांना स्वतंत्र आर्थिक जवाबदारी देणे.

🎯 VPDA कसा कार्यान्वित होतो?

Ø  निधी मंजुरी: शासन एखाद्या योजनेसाठी निधी मंजूर करते.

Ø  BEAMS प्रणाली: हा निधी BEAMS प्रणालीत VPDA म्हणून विभागाच्या नावावर दाखल केला जातो.

Ø  खर्चाचा मागोवा: विभाग त्या खात्यातून खर्च प्रस्ताव तयार करतो आणि खर्चाचा तपशील BEAMS वरून ट्रॅक करता येतो.

Ø  बँक व्यवहार न करता खर्च: या खात्यातील व्यवहार हे केवळ आभासी स्वरूपात असतात. प्रत्यक्ष बँक खाते उघडले जात नाही.

उदाहरण: ग्रामविकास विभाग एखाद्या गावात रस्ते बांधणीसाठी ₹10 लाख मंजूर करतो. हे पैसे BEAMS मध्ये VPDA मध्ये जमा होतात आणि खर्चही त्यातूनच होतो.

VPDA चे फायदे:

         फायदे                              स्पष्टीकरण

पारदर्शकता                          प्रत्येक खर्चाचा डिजिटल मागोवा ठेवता येतो.

आर्थिक शिस्त                       विभाग फक्त मंजूर निधीच्या मर्यादेतच खर्च करतो.

एकत्रित नियंत्रण                   वित्त विभागाला सर्व खात्यांवर नियंत्रण ठेवता येते.

सुलभ लेखाजोखा                 ऑडिट व लेखापरीक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध असते.

बँक प्रक्रियेची गरज नाही       प्रत्यक्ष बँक व्यवहार न करता खर्च व्यवस्थापन करता येते.

👉संकेतस्थळ:- https://beams.mahakosh.gov.in/vpda/login  

  🌀महत्वाची सुचना:- सदर संकेतस्थळावर लॉगीन करण्यासाठी BEAMS प्रणालीच्या User ID and Password Assistant आणि DDO Login वापर करावा. वेगळया User ID आणि Password ची आवश्यकता नाही.

👉 वित्त विभाग शासन निर्णय:-

1. सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांचेकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Account) ही व्यवस्था व कार्यपध्दती लागू करणेबाबत.- VIEW

2. आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपध्दतीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उदिष्ट शिर्ष २७३३५० आणि ५३ साठी देयकांचे विशिष्ठ नमुने निश्चित करणेउदिष्टशिर्ष ५२ चा अंतर्भाव आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपध्दतीमध्ये करणेआणि आभासी वैयक्तिक ठेव लेख्यांना महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ४९५ च्या तरतुदीमधून अंशत: सूट देणेबाबत.-VIEW

👉NEWआभासी वैयक्तिक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Account) प्रणालीत अदात्यांची संख्या जास्त असल्यास (Bulk Payee) प्रदान करण्यासाठी माहितीपुस्तिका -VIEW

👉NEWआभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीमधून रक्कम समर्पित करणेबाबतचे परिपत्रक व युजर मॅन्युल - VIEW

 



 👉  लातूर कोषागार कार्यालय अधिनस्त VPDA प्रशासक यादी VIEW

 👉 वित्त विभाग शासन निर्णय

अ.क्र.

आभासी वैयक्तिक ठेव लेखा

(Virtual Personal Deposit Account (VPDA)

DOWNLOAD

1

शासकीय आहरण व संवितरण अधिकारी कार्यालयास VPDA प्रशासक म्हणून मान्यता मिळणेसाठीची कार्यपध्दती.

 DOWNLOAD

2

अर्धशासकीय/अशासकीय/स्वायत्त संस्था/यंत्रणा आहरण व संवितरण अधिकारी नसलेल्या कार्यालयास आभासी वैयक्तिक ठेव लेखा(Virtual Personal Deposit Account (VPDA) प्रशासक म्हणून मान्यता मिळणेसाठीची कार्यपध्दती.

 DOWNLOAD

3

VPDA प्रस्ताव  (मा.संचालक, लेखा व कोषागारेमुंबई यांना सादर करणेसाठी VPDA Code) 

 DOWNLOAD

  4    

VPDA Workflow Process (कार्यपध्दती)

 DOWNLOAD

5

निरंक देयक नमुना (म.को.नि.४४)

 DOWNLOAD

6

चलन नमुना प्रत (देयकासोबत जोडावयाचे चार प्रतीत)                                                    

 DOWNLOAD

7

Payment Scroll Report Format  (SBI CMP Fast प्रणालीतील)

 DOWNLOAD

8

Cash Book Register. (VPDA लॉगईन मधील)

 DOWNLOAD  

9

NEW- 18.07.2025- आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपध्दतीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक म्हणून घोषित आहरण व संवितरण अधिकारी यांनी मुंबई वित्तीय नियम , १९५९ मधील नियम ५७ आणि महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम २८२ अन्वये विहित तरतूदींचे काटेकोर अनुपालन करणेबाबत.

 DOWNLOAD