* नवीन
सेवार्थ प्रणालीबाबत सुचना *
मा.संचालक, लेखा
व कोषागारे संचालनालय, मुंबई यांचे ई-मेल दिनांक 06.02.2026
अन्वये पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच माहे-एप्रिल-2026 पासून टप्प्याटप्प्याने सर्व कोषागारे व उपकोषागार कार्यालय अधिनस्त सर्व
आहरण व संवितरण अधिकारी यांना नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणी करण्याचे
प्रस्तावित करण्यात आलेले आहे. सदरील कार्यवाही पुर्ण करणेकरीता आहरण व संवितरण
अधिकारी यांचे वर्गवारी मोठया/मध्यम/लहान अशा स्वरुपात करावयाची आहे. त्याकरीता या
कार्यालयामार्फत गुगल शीट तयार करण्यात आलेली आहे. सदरील गुगल शीट पुर्णपणे भरावी
तसेच सदरील गुगल शीट मध्ये उपकोषागार निहाय वेगळी शिट तयार करण्यात आलेली आहे.
सदरील कार्यवाही ही दिनांक 20/02/2026 पर्यंत पुर्ण करावयाची
आहे.